सूफी पंथ


         



              वाङ्‌मयचार्यांच्या पुष्टिमार्गातील भक्ती आणि चैतन्य संप्रदायातील भक्ती यांचे सूफी पंथातील भक्तीशी विलक्षण साम्य आहे. भारतीय संप्रदायातील मधुरा भक्तीत परमेश्वर हा प्रियकर आणि भक्त प्रेयसी अशी भूमिका आहे; सूफी पंथात भक्त हा प्रियकर आणि परमेश्वर प्रेयसी असे उलट नाते आहे. आपल्याकडेही सुकी वळणाचे मधुरा भक्तीचे एखादे उदाहरण सापडते. जसे, व्हाडातील देवनाथ कवीने स्वतः प्रियकर बनून परमेश्वराला प्रेयसी कल्पून आळविलेले आहे. संतश्रेष्ठ गुलाबराव महाराजांची ही भक्ती याच रूफी , मधुरा धर्तीची राहिलेली आहे. तात्पर्य काय की दोन्हीकडे परमेश्वर आणि भक्त यांच्या प्रेम संबंधात शृंगाराचा उन्मादक रंग मिसळलेला आहे. पुष्टिमार्गी भवित साधनेत कृष्णगोपीप्रेम आणि तदनुसार आचरण यांना फार महत्व आहे. चैतन्यप्रभूच्याही भक्तीच्या आविष्कारात गोपीभाव आहे.: स्वतःला राधा समजून तळमळुन त्यांनी श्रीकृष्णाला आळविलेले आहे. दक्षिणेकडील अळवार संतांच्याही चरित्रात मधुरा भक्तीचा विलास प्रकट झालेला आहे विरहाने रडणे, ओरडणे, नाचणे, गात राहणे आणि मूर्च्छित होणे हे चैतन्य प्रभूच्या भक्तिमार्गात सापडणारे भावोद्रेकाचे प्रकार अळवार भक्तांतही आढळून येण्यासारखे आहेत. मधुरा भक्ती हा भक्तीचा सर्वश्रेष्ठ प्रकार आहे. विवेकानंदांसारख्या थोर पारमाथिक विचारवंतांचीही साक्ष अशीच आहे. असे असूनही, मधुरा भक्तीमुळे व्यक्तीच्या आणि पर्यायाने समाजाच्या जीवनाला विकृत वळण लागते, असे तिच्यासंबंधी दोषारोपण करण्यात आले आहे. हे दोबारोपण व्यर्थ आहे. भक्तीचा नीताशी काही संबंध नाही. भवती स्वतंत्र आहे. स्वयभू आहे. ती अंगयीय शुद्ध, निर्मळ आहे. सांकेतिक नातीच्या  म मर्यादेत ती नांदावयला तयार नाही. ज्ञान - कर्म - योग यांची बंधने ती कधी मानणार नाही. गोपिका ह्या  विवाहित स्त्रिया आहेत. त्यांचे श्रीकृष्णावर वालभ जडले. त्या त्याच्याशी एकरूप झाल्या. परमेश्वरस्वरूप बनल्या, मुक्त झाल्या, खुद्द भगवंतांनीच ज्ञानेश्वरीत सांगितले आहे...

         पाहे पां वालभाचेनि व्याजें ।

         तियां व्रजांगनांची निजे ।

         मज मीनलेया काइ माझें ।

         स्वरूप ना होतिचि ॥

गोपीचे वर्तन रूढ व समाजमान्य नीतिनियमांना धरून थोडेच आहे? तरीही पण श्रीकृष्णाचे क्षणभर विस्मरण होताच परमव्याकुळ होणाऱ्या या ब्रजगोपिकांचे प्रेम हे भक्तीचे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे, असे नारदभक्तिसूत्रात स्पष्टपणे म्हटलेले आहे. " यथा व्रज गोपिकानाम् !" राज घराण्यातील एक विवाहित स्त्री लोकलज्जा सोडून महालातून बाहेर पडून रस्त्यावर नाचते, ईशभक्तीपर गीते बेहोषीने गाते, हे काय लौकिक नीतीशी सुसंगत आहे? एक राजा भक्तीने मत्त मुक्त होऊन राजवैभव लाथाडतो, खुषीने दारिद्रय पत्करतो आणि दुसऱ्या एका निर्धन भक्ताच्या अफाट दारिद्र्याला ठिगळ लावण्याकरिता आपल्या पत्नीसह रस्तोरस्ती हिंडून ईश्वराची गाणी म्हणत भीक मागत सुटतो, हे वर्तन काय लौकिक नीतीच्या चौकटीत बसणारे आहे? प्रेमाचे - विशेषतः ईश्वरावरील अनन्य, अगाध प्रेमाचे सामर्थ्य तर्काला बुद्धीला न कळण्यासारखे आहे. प्रेमाशिवाय श्रुतिस्मृतिज्ञान, प्रेमाशिवाय ध्यानपूजन, प्रेमाशिवाय श्रवणकीर्तन सर्व व्यर्थ आहे; अशा या प्रेमाच्या अवस्थेत पाप जरी घडले तरी ते पावन होऊन जाते. कारण त्या पापातही परमेश्वर प्रकट होतो. भागवतधर्माप्रमाणे परमेश्वराशी अतूट, अव्यभिचारी प्रेमाचे नाते जोडले असता, असे प्रेम करणाऱ्या भक्ताच्या बाबतीत पाप - पुण्य, कर्म - अकर्म, वर्णाश्रमधर्म या सगळ्यांचा सासुरवास संपुष्टात येतो. हे प्रेमभक्तीचे ऐश्वर्य समजावून सांगताना एकनाथांनी आपल्या भागवतात लिहिले आहे. 

          प्रेमेंवीण श्रुतिस्मृतीज्ञान ।

         प्रेमेंवीण ध्यानपूजन ।

         प्रेमेंवीण श्रवण - कीर्तन ।

        वृथा जाण नृपनाथा ॥

        ऐसें आचरिता भागवतधर्म ।

       बांधूं न शके कर्माकर्म ।

       कर्मासी ज्याची आज्ञा नेम ।

       तो पुरुषोत्तम भजनामाजी ॥

      कर्म करूं पावे प्रमादु ।

      तंव प्रमादी प्रकटे गोविंदु ।

      यालागी विधिनिषेधु ।

       न शकती बांधूं हरिभक्ता ॥

       भजन प्रतापसत्ता लक्षणे ।

       स्वधर्मकर्मा ऐसें दंडणें ।

       वर्णाश्रमांचा ठावो पुसणें ।

       होळी करणें कर्माची ॥

       एवं भागवतधर्मे जे सेवक ।

      स्वधर्मकर्म त्यांचे रंक ।

       ते राहों न शके त्यासन्मुख ।

       मा केवी बाधक हो शकेल ॥

सर्व कर्मधर्माच्या पलीकडे असलेले हे प्रेम. हे ईश्वरी प्रेम आहे. ईश्वराच्याच प्रेरणेने त्याच्या प्राप्तीसाठी मानवाच्या अंतःकरणात उत्पन्न होणारे हे प्रेम आहे. या प्रेमाचे झरे इथले, या देशातलेच आहेत. पृथ्वीच्या पाठीवर जेथे जेथे मनुष्य वस्ती आहे तेथे हे झरे आहेत. झाडांच्या कलमाप्रमाणे एका ठिकाणाचा झरा आणून दुसऱ्या ठिकाणी नेअन तेथे त्याचे कलम करता येत नसते. भारतात पंधराव्या सोळावा शतकांत या झऱ्यांतून फार वेगाने, जोराने हे पाणी वर आलेले आहे. देशभर पसरलेल्या तीर्थस्थळांच्या यात्र करून भारतातल्या निरनिराळव प्रांतांतल्या संतांनी योजनापूर्वक या झऱ्यांचे पाणी देशात सर्वत्र खेळविलेले आहे. 

             सूफी दर्शन हे इस्लामचे अध्यात्मिक वैभव आहे. इस्लामच्या साक्षात्कारवादाचे दिव्य तेज त्यात प्रकट झालेले आहे. निरुद्योगी पंडितांनी सूफी या शब्दात अनेक अर्थाचे गाठोडे सापडलेले आहे.

१) सूफ - ऊन. तिकडे संन्यस्त, विरक्त वृत्तीचे लोक ऊनी वस्त्र वापरीत असत. सूफीही संन्यस्त, विरक्त. तेही ऊनी कपडे वापरू लागले म्हणून सूफी झाले.

२) सफा - पवित्रता. सफा जीवन जगणारे ते सूफी.

३) महंमद पैगंबराच्या काळी मदिना येथील मशिदीच्या समोरच्या बाकावर बसणाऱ्या भक्तांना ' अल्ह अल - सुफ्फाह' असे म्हणत. यातील ' सुफ्फाह ' पासून ' सूफी' अवतरलेला आहे.

४) प्रार्थनेच्या वेळी प्रथम पंक्तीत असणारे ते ' सफ्फे अव्वल'. त्यातील ' सफ्फे' तून ' सूफी' 

५) महंमद पैगंबरांच्याही पूर्वीच्या काळी सर्व सांसारिक व्यापारांचा परित्याग करून मक्केतील देवालयात सेवाव्रताने राहणार्‍यांना 'सूफाह' म्हणून संबोधीत. त्यातूनच ' सूफी' 

६) सूफी दर्शनाचे नाव ' तसव्वुफ' असे आहे. ग्रीक शब्द ' सोफीस्ता' पासून ' सूफी' आणि ' थियोसोफिया ' पासून ' तसव्वुफ' अशीही व्युत्पत्ती देण्यात आली आहे.    

ग्रीकमधले सोफी हे ज्ञानार्जनात आणि तत्वचिंतनात मग्न असत. परंपरेवर, रूढीवर ते विश्वास ठेवीत नसत. ' सूफी' ही संज्ञा या सोफीपासून उत्पन्न झालेली आहे असे महापंडित राहुल सांकृत्यायन यांचे मत आहे. वरील सर्व मतांत तेच सर्वात जास्त स्वीकारार्ह वाटण्यासारखे आहे. सूफी वृत्तीचे लोक महंमदसाहेबांच्याही वेळी होते; पण तशा वृत्तीच्या लोकांना ' सूफी' म्हणण्याचा प्रघात महंमदसाहेबांच्या नंतर दोनशे वर्षांनी पडलेला आहे.

            अंतःशुद्धता, अंतर्मुखता, ईश्वरमीलनासाठी उत्पन्न झालेली अनावर व्याकुळता ही सूफी वृत्तीची मुख्य खूण आहे. परमात्म्याच्या साक्षात्काराची विलक्षण ओढ, हे सूफी वृत्तीचे एक महत्त्वाचे लक्षण आहे. ही ओढ कोणत्याही देशातल्या, कोणत्याही धर्मातल्या मनुष्याच्या अंतःकरणातली  स्वाभाविक ऊर्मी आहे. या उर्मीच्या पातळीवर सर्व धर्म एक आहेत. कोणत्याही धर्माचे बाह्यांग थोडे खरबडून काढले आणि आतला तेजोमय गाभा पाहिला तर असे दिसेल की तो गाभा आणि सूफी मत एकच आहे. सूफी मत म्हणजे ईश्वरप्रेमाने रसरसलेले जिवंत, जाज्वल्य अध्यात्म आहे . ईश्वरदर्शनासाठी पागल झालेला मारूफ अल - करखी ( इ. स. ८१५) या सूफी साधकाने म्हटलेले आहे :

        हसन- अल- बसरी उर्फ अबू अली ( जन्म इ. स. ६४३, मृत्यू ७२८) याने आपल्या एका सोबत्याला उपदेश केला होता : बाबा, या संसारात माणसाने तीन गोष्टींपासून सावध असावे : 

१) बादशाहा २) स्त्री ३) गप्पा

"अनासक्तीचा एक बिंदू हा हजार वर्षे केलेल्या नमाजापेक्षा आणि रोजापेक्षा श्रेष्ठ आहे." हे त्याचे वचन सूफींच्या रहस्याचे उत्तम उद्‌घाटन करणारे आहे. प्रारंभीच्या काळात सूफी मताच्या प्रदेशात ईश्वरविषयक प्रेम होतेच, पण भर अनासक्तीवर, वेराग्यावर, फकिरी बाण्यावर, देहदंडनावर होता. रबिया (इ. स. ७१७-८०१) या प्रदेशात आली आणि तिने तेथे उन्मादक प्रीतीची अमर बाग फुलवून दिली. तिचा खूप छळ झाला पण तो तिने सगळा प्रभुप्रेमाच्या पाण्याबरोबर बिनतक्रार गिळून टाकला. ज्ञानाने, विद्वत्तेने, तर्काने, संपत्तीने परमेश्वर कधीच मिळू शकत नाही. अनन्य, अपार, अखंड प्रेमाणेच तो मिळतो. रबियाने तो तसाच मिळविला. प्रेममार्ग हा भक्तिमार्गच आहे, पण प्रेम मार्गात उत्कटता, उत्तानता, उन्मादकता अधिक. पुन्हा, भक्तीत द्वैत रेंगाळत असतेच; भक्ताच्या ठिकाणी वेगळेपणाची जाणीव थोडी तरी असते; पण भक्तीचे जेव्हा प्रेमात रूपांतर होते तेव्हा ती जाणीव, मीठ समुद्रात विरून जावे तशी विरून जाते. रबिया या ईश्वरी प्रेमाच्या अद्वैतात सतत रंगलेली होती. एकदा वसंत ऋतूत एका सुंदर प्रातःकाळी निसर्गाचे सौंदर्य खूपच खुललेले होते. रबिया आपल्या कुटीत प्रभुचिंतनात मग्न होऊन बसली होती. एका परिचारिकेने तिला म्हटले," रबिया, कुटीच्या बाहेर येऊन परमात्म्याची ही सुंदर कृती तर पाहा!" रबिया म्हणाली," अग, तूच आत ये आणि त्या निसर्गसौंदर्याला निर्माण करणाऱ्या परमेश्वराला पाहा. " एकदा तिला स्वप्नात महंमद पैगंबर दिसले. महंमदसाहेबांनी तिला विचारले,"  रबिया, तू माझ्यावर प्रेम करीत नाहीस?" ती म्हणाली," महंमदसाहेब, आपण ईश्वराचे रसूल आहात; असा कोण आहे की जो आपल्यावर प्रेम करीत नाही? पण परमात्म्याच्या प्रेमाने माझ्यावर एवढा अधिकार गाजविलेला आहे की त्या प्रेमाशिवाय, त्या परमात्म्याशिवाय कोणावर प्रेम करावयाला वा कोणाबद्दल घृणा बाळगावयाला माझ्या हृदयात जागाच नाही." रविबा अत्यंत उच्च कोटीची साधक होती. हसनअल - बसरी या थोर साधकाच्या मनात तिच्याबद्दल निस्सीम आदर होता. एकदा हसन अल - बसरी हे धमोंपदेश करावयाला बसले. श्रोते जमले. त्या दिवशी रबिया येऊ शकली नाही. हसन बोललेच नाहीत. मौन  राहिले. त्यावर एकजण म्हणाला," आपला धर्मोपदेश ऐकण्यासाठी इतके ज्ञानी येथे जमलेले आहेत आणि एक म्हतारी आली नाही म्हणून काय हरकत आहे? आपण प्रवचन सुरु करावे." तेव्हा हसन म्हणाले," हत्तीसाठी भी जे सरबत तयार केले होते ते मी एका मुंगीसाठी देऊ इच्छित नाही". 

           जून - नून याचे पूर्ण नाव  अबुल फैज जून - नून बिन इब्राहिम अलमिस्त्री ( इ.स.७९६-८६०) हा एक थोर सूफी संत व तत्त्वज्ञ. सांसारिक प्रलोभनाचा त्याग आणि पापाबद्दल पश्चात्ताप या गोष्टी त्याच्या मते साधकाच्या ठिकाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. साधारण मनुष्य पापाबद्दल पश्चात्ताप करतो, पण साधक मात्र आपण इतके दिवस गाफिल राहिल्याबद्दल खंत बाळगतो, अनुमत होतो. परमार्थमार्गावरचा प्रवास सुरु करतानाचा पश्चात्ताप हा पहिला टप्पा आहे. एकनाथांनीही चिरंजीवपद मिळविण्यासाठी जीवाने प्रथम अनुतप्त झाले पाहिजे असे म्हटले आहे ना? जगातले सर्व संत एक आहेत, त्यांचा अनुभव एक आहे, त्यांचे प्राप्तव्य एक आहे. आमच्या महाराष्ट्रातले, आमच्या वारकरी पंथातले, आपल्या वेदिक संस्कृतीतले संत दे इस्लाममधल्या किंवा ख्रिश्चन धर्मातल्या वा अन्य कोणत्याही पंथातल्या संतांपेक्षा श्रेष्ठ आहेत असे जे मानीत असतील ते केवढे ही विद्वान असले तरी पापी आहेत, देवद्रोही आहेत! असो.

             सूफी दर्शन हे इस्लामचेच अपत्य आहे, पण बापलेकांत संपूर्ण मतैक्याचा अभाव आहे. दोघांनाही कुराण हा ग्रंथ मान्य; पण कट्टर मुसलमानांना, उलेमांना तो पूर्णपणे मान्य तर सूफी संतांना तो विशिष्ट प्रमाणात, विशिष्ट दृष्टीने विशिष्ट मान्य. सूफी म्हणातात, कुराणात दोन प्रकारचे ज्ञान आहे. 

१) इल्मे सफीना म्हणजे ग्रंथनिहित ज्ञान

२) इल्मे सीना म्हणजे हृदयनिहित ज्ञान.

पहिले ज्ञान हे सर्वसाधारण मुसलमानासाठी आहे तर दुसरे ज्ञान हे मदमदसाहेबांच्या हृदयापर्यंतच राहिलेले आहे. या दुसऱ्या ज्ञानाबद्दल सूफींना जिव्हाळा आहे. इस्लाममध्ये कुराणाइतकेच हदीसलाही महत्त्व आहे. हदीस म्हणजे मदमदसाहेबांची कुराणाबाहेरची वचने. कट्टर सनातनी मुसलमान हे कुराणाच्या आणि हदीसच्या केवळ शब्दार्थावर भर देतात; सूफी संत हे त्यांतून गूढ स्वरूपाचा अध्यात्मवादी आणि साक्षात्कारवादी आशय शोधून काढतात. हिंदू धर्मात कर्मठ ब्राम्हण आणि उदार मानवतावादी संत यांच्यांत जो फरक आहे तोच इस्लाममध्ये उलेमा आणि सूफी संत यांच्यांत आहे. उलेमा व कट्टर मुसलमान हे कर्मकांडाच्या, बाह्याचारांच्या परिवालनाबद्दल कठोर कटाक्ष बाळगणारे. सूफी संत हे उदार वृत्तीचे, अंतः शुद्धीला प्राधान्य देणारे. सनातनी वृत्तीच्या इस्लाममध्ये, मुसलमान म्हणजे विश्वासास पात्र आणि काफिर म्हणजे विश्वासास अपात्र, या भेदाचे फार स्तोम  माजविले जाते. सूफी हा भेद मानीत नाहीत. जिहादचाही अर्थ ते कट्टर मुसलमानांहून निराळा घेतात. आपल्याच ठिकाणच्या दुष्ट, अनिष्ट प्रवत्तींशी लढा देणे, हाच खरा जिहाद, असे सूफी समजतात. परमार्थात गुरुचे मार्गदर्शन आवश्यक आहे, अशी सूफीची श्रद्धा आहे. कट्टर इस्लामला गुरुवाद नामंजूर आहे. सूफी संत हे संन्यस्त, विरक्त वृत्तीने राहणारे आहेत. त्यांना संसाराबद्दल आकर्षण नाही. उलट, एका हदीसमध्ये म्हटलेले आहे की " ला रूहबानियत फिल इस्लाम" म्हणजे इस्लममध्ये संन्यासाला स्थान नाही. खरे पाहता वैराग्याशिवाय  धर्मपालन आणि ईश्वरकृपासंपादन अशक्य आहे. कुराणाच्या सुरवातीच्या सुरांतून वेराग्याची महती सूचित केलेली आहे. पुन्हा, खुद्द महमदसाहेब आणि इस्लामचे सुरवातीचे अनुयायी यांच्या जीवनात वैराग्याचा प्रखर प्रकाश पसरलेला आहे. सूफी साधकांना एकांतसेवन प्रिय आहे कारण ते परमार्थाला पोषक आहे. कट्टर इस्लामला त्याचे महत्त्व अमान्य आहे.

       कट्टर इस्लाम आणि सूफीवाद यातला महत्त्वाचा फरक हा आहे की इस्लाम द्वैती आहे तर सूफी दर्शन अद्वैती आहे. कुराण एकेश्वरवादी आहे. सूफीही एकेश्वरवादी आहेत, पण त्यांचा एकेश्वरवाद हा सर्वात्मवाद आहे. जामी म्हणतो : " निरपेक्ष, अगोचर, अपरिमित, नानात्वातीत असा जो अद्वितीय पदार्थ आहे तोच अल हक्क म्हणजे परमसत्य आहे. ही सगळी सृष्टी त्या परम सत्याची बाहय अभिव्यक्ती आहे. ते परम सत्य म्हणजे या सृष्टीतील अभ्यन्तर अदृश्य सत्य आहे." तो परम सत्य आहे, परम कल्याण आहे, परम सोंदर्य आहे. सूर्य आणि त्याचे किरण यांचा जो संबंध तोच परमात्मा व सृष्टी यांचा संबंध आहे. अल - शिबली म्हणतो : " प्रेम हे प्रज्वलित अग्नीसारखे आहे. परम प्रियतमाविषयीच्या इच्छेशिवाय अंतःकरणातने सगळे काही त्या अग्नीत जळून नष्ट होऊन जाते." स्वतःचे  अस्तित्वच ईश्वरीतत्त्वात नष्ट करून टाकण्याचा हा सूफी भाव आणि ज्ञानदेवांच्या अमृतानुभवातील " नातरी नीद जातखेवो । पावे आपुला ठावो | तैशी बुद्धित्यागे देवी - देवो । बंदिली मियां ॥ सांडूनि मीठपणाचा लोभू । मिठे सिंधुत्वाचा घेतला लाभु । तेवि अहं देवोनि शंभु । शांभवी झालों ॥" या ओव्यांतील भाव एकच नाही काय ?

          सूफींच्या झालेल्या छळातील क्रूरतेने परिसीमा गाठली ती मन्सूरच्या बाबतीत. याचे पूर्ण नाव हुसैन बिन मन्सूर अल - हल्लाजा. हा थोर सूफी साधक इ. स. ८५८ हे त्याचे जन्म वर्ष. 'अनल हक' -' मी ब्रम्ह आहे' ही त्याची प्रमाणिक अनुभूती; पण या अनुभूतीचा निर्भयपणे उच्चार केल्याबद्दल त्याला प्राणदंड भोगावा लागला. आठ वर्षे, सात महिने, आठ दिवस त्याला कारावासात डांबून ठेवण्यात आले. बाहेर पडल्यावर त्याला तीनशे फटके मारण्यात आले. प्रत्येक फटक्यागणिक तो 'अनल - हक' चा उच्चार करी. नंतर त्याला सुळावर चढविण्याचे ठरले ते पाहावयाला एक लाख लोक जमले. काहींनी त्याच्यावर दगडांचा वर्षाव केला. शेवटपर्यंत त्याची स्थितप्रज्ञ, शांत अवस्था कायम रहिली. मग त्याचे नाक,कान कापण्यात आले. शेवटी त्याची जीभ कापण्यात आली. अखेरीस खलीफाचा हुकूम आला तेव्हा त्याचे मुंडके उडविण्यात आले. ही घटना २६ मार्च इ. स ९२२ मध्ये मंगळवारी घडली. 

          सूफी दर्शनाबद्दल संशोधकांचे असे म्हणणे आहे. सूफी दर्शन हा काही एकरस, एकरंग, एकजिनसी प्रवाह नसून त्यात इतर अनेक धर्मातील साक्षात्कारवादी विचारांचे प्रवाह येऊन मिळालेले आहेत.

उदाहरणार्थ :

         श्री ताराचंद यांनी आपल्या ' Influence of Islam of Indian  Culture' या ग्रंथात असे म्हटले आहे की Sufism is a complex phenomenon;it is like a stream which gathers volume by the joining of tributaries from many lands. It's original source is the Quoran and the life of Muhammad. Christianity and neo-Platonism swelled it by a large contribution. Hinduism and Buddhism supplied a number of ideas,and the religion of ancient Persia Zorostranism,Manism etc. Brought to it their share. 

          श्री. रामपूजन तिवारी यांनी ' सूफी मत : साधना और साहित्य' या आपल्या ग्रंथात लिहिले आहे : " सूफीमत में ऐसे बहुतसे विचारों और सिद्धान्तोंका समावेश है जो इस्लाम की प्रवृत्तिके बिलकुल विपरीत है अतएव उनके प्रत्यक्ष या अप्रत्यक्ष प्रभावको मानने के सिवा दूसरा कोई चारा नहीं रह जाता ।" 

        डॉ. रामकुमार वर्मा यांनी ' हिंदी साहित्य का आलोचनात्मक इतिहास' या आपल्या ग्रंथात या सूफी संतांबद्दल लिहिले आहे : ' सूफी संत अपनी व्यक्तिगत महत्ता और साधना के अनुसार ही जनता और राज्य में श्रद्धा और आदर की संपत्ति प्राप्त करते थे और अपने आचरण की सात्विकता और पवित्रता से वे अपने सिद्धांतो का प्रचार अपने पर्यटन क्षेत्र में किया करते थे ।

           सनातन पंथी इस्लाम आणि सूफी दर्शन यांच्यात वेगळेपणा नसून सामंजस्य आहे हे प्रस्थापित करण्याचे ऐतिहासिक महत्त्वाचे कार्य सुप्रसिद्ध सूफी साधक गजाली ( जन्म इ. स १०५८, मृत्यू ११११) याने केलेले आहे. गजाली हा महापंडित होता. सूफी पंथातला व्यास, असा त्याचा गौरव करणे शक्य आहे; सूफी साधकांना जो ब्रम्हसाक्षात्कार झाला तो काय भारतीय वेदान्ताचे किंवा प्लेटोचे ग्रंथ वाचून झाला असे समजावे काय? पृथ्वीच्या पाठीवर इथून तिथून सर्व स्थळी सर्व काळी माणसाचे मन एकच आहे.

सूफी संत आणि भारतातील भक्तिमार्ग

           प्रेममार्गी सूफी साधकांचे आगमन झाल्यानंतर पंधराव्या शतकात भारतीय भक्तिमार्गात नवाच उत्साह, नवाच आवेग, नवाच उन्माद उफाळून वर आला असे म्हणता येणे शक्य आहे. वस्तुस्थितीच तशी आहे. राम किंवा कृष्ण किंवा विठ्ठल अशा कोणत्या तरी एकाच देवतेवर पूर्णपणे केंद्रित झालेली भक्ती, पापाची टोचणी अशा कोणत्या तरी एकाच देवतेवर पूर्णपणे केंद्रित झालेली भक्ती, पापाची टोचणी आणि तीतून स्फुरलेल्या अनुतापातून जागृत झालेली प्रखर विरक्ती, परमेश्वराजवळ अनन्य शरणागती, लौकिक रीतभातींची, आशा आकांक्षांची कदर न करणारी प्रेमाच्या उन्मुक्त उत्तान आविर्भावातली बहोष धुंदी, प्रियतम प्रभूविषयीच्या प्रमोत्कर्षाला प्रियकर - प्रेयसीला संबंधाच्या माध्यमातून मिळालेल्या अभिव्यक्तीतील शृंगारमधुर पण निष्पाप मस्ती - भारतीय भक्तिरमणीच्या ठिकाणी पंधराव्या सोळाव्या शतकात विशेष उत्कटतेने हे जे विदग्ध विभ्रम प्रकट झाले. श्री. न. र. फाटकांसारख्या जागरूक लेखकाने ' श्री एकनाथ : वाङ्‌मय आणि कार्य' या आपल्या ग्रंथात " हिंदूंच्या भक्तिमार्गाने सूफी संप्रदायाची उसनवारी अगदीच केली नाही असे समजू नये" सूफी आले आणि मग येथे भक्तीचे बीज अंकुरले असे सुचवावयाचे नाही. भक्तीचा उभ्द्रव या देशात आर्यपूर्व काळातच झालेला आहे. भक्ती ही आर्येतर आणि अनार्य वस्तू आहे. आर्य हे तर प्राधान्याये प्रवृत्तिमार्गी आणि भक्तिभावनेला निरपवाद निस्सीम निवृत्तीशिवाय बहर येणे अशक्य आहे. भक्ती ही आर्यपूर्व, आर्येतर कशी आहे याचे सुंदर व प्रभावी विवेचन डॉ. शं दा. पेंडसे यांनी 'साधना' या लेख - संग्रहातील 'आर्य आणि द्रविड' या लेखात केलेले आहे. त्यांनी म्हटले आहे : " वैदिक आर्य येथे येण्याच्या पूर्वीही हिंदुस्थानातील लोक सुधारलेले होते व त्यांच्या स्वतःच्या अशा देवधार्मिक कल्पना होत्या. 'सनक' हे नाव सनक, सनंदन, सनत्कुमार या भक्तिमार्गाच्या प्रस्थापकांपैकी एक आहे. यादव व यमुना काठचे कृष्ण हे भक्तिमार्गी असल्याचे प्रसिद्धच आहे. अहिंसा, सत्य, दया, प्रेम, निर्लोभता, निष्कपटता हे सर्व उत्कृष्ट मानवी गुण त्याच्या ठिकाणी एकवटलेले असतात. त्याचा आचार पवित्र व कोणालाही न दुखविणारा असतो. श्री. रा. चिं.ढेरे यांनीही आपल्या ' मुसलमान मराठी संतकवी' या पुस्तकात सांगितलेले आहे : " चौदाव्या शतकाच्या  पूर्वार्धात चौदाशे सूफी प्रचारकांनी देवगिरीच्या परिसरात आपले प्रधान केंद्र ठेवून सारा महाराष्ट्र व्यापला आणि इस्लामच्या बलात्कारी विस्ताराची मोहीम उघडली. मुस्लिम राज्यकर्त्याप्रमाणेच यांनी मठमंदिरांचा विध्वंस केला, सक्तीने धर्मोतर घडविले आणि सिद्धीच्या प्रदर्शनाने हजारो हिंदूंना नादी लावले." एकनाथाच्या चरित्रात एका दंडवत स्वामीचे प्रकरण उपस्थित झालेले आहे. त्याने आपल्या आध्यात्मिक सामर्थ्याने एका मेलेल्या गाढवाला जिवंत केले. दंडवतस्वामीच्या या सामर्थ्याचा यवन सत्ताधारी दुरुपयोग करून घेतील अशी नाथांना भीती वाटली आणि त्यांनी त्याला लागलीच समाधी घ्यावयाला लावली.

          चौदाव्या आणि पंधराव्या शतकांत महाराष्ट्रात कितीतरी संतमंडळी होऊन गेली; पण त्यांच्याशी सूफींचा संबंध आल्याचे दिसून येत नाही. मुसलमानांच्या राजकीय वर्चस्वामुळे १४ व्या शतकात ठिकठिकाणी मशिदी, दर्गे, छल्ले, खानके, इ. दिसू लागले. न्यायदानाच्या कामाकरिता म्हणून काजींच्या नेमणुकी झाल्यामुळे आणि मुसलमानांच्या बकरीद, रमजान, शबेबरात इ. सणावारांच्या उत्सवांना सरकारी पाठबळ असल्यामुळे मुसलमानी रीतिरिवाजांची ओळख बहुजनसमाजाला होऊ लागली होती. याबरोबरच धर्मप्रचारकांच्या कामाचाही परिणाम होणे अपरिहार्य होते. यामुळे बरेच लोक साधू, फकीर, पीर आणि फकिरांच्या भक्तीत, दर्ग्यांच्या नवसांत आणि प्रसादभक्षणात आक्षेपार्ह असे काही नाही, असे समजू लागले. आणि या वागणुकीवरच नाथ आणि समर्थ इत्यादींचा कटाक्ष होता. सामाजिक चालीरीतींवर वरील प्रकारांचा परिणाम झाला यात शंका नाही. पण तत्कालीन संतवाङ्‌मयावर सूफींच्या तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब पडल्याचे दिसून येते.

 

ليست هناك تعليقات:

pritisdeshmukh25@gmail.com

صور المظاهر بواسطة RBFried. يتم التشغيل بواسطة Blogger.