नागेश संप्रदाय


 




मुसलमान मराठी संत अलमखान याच्या परमार्थप्रीतीची कळी प्रफुल्लित करून त्याच्या साक्षात्काराचा सुगंध सभोवती पसरविणारे जे वडवाळ क्षेत्रीचे नागनाथ त्यांनी प्रवर्तिलेल्या नागेश संप्रदायाचा आरंभ केला. हा संप्रदाय उदार अंतःकरणाचा. हिंदू, मुसलमान, वैष्णव, वीरशैव या सगळ्यांना आस्थेने जवळ करणारा. नागेश संप्रदाया विषयी असे म्हणता येईल, "श्री ज्ञानेश्वर महाराजांपासून तो श्री एकनाथ महाराजांपर्यंतच्या तीनशे वर्षांच्या अवधीत महाराष्ट्र वाङ्मयात जो खड्डा पडलेला दिसतो तो भरून येण्याची चिन्हे दिसत आहेत." यावरून या संप्रदायाचे - त्याच्या वाङ्‌मयाचे वाङ्‌मयेतिहासाच्या दृष्टीने असलेले महत्त्व सहज लक्षात येण्यासारखे आहे.

                     नागेशांच्या नावाशी संलग्न असलेले व त्यांचे स्वतंत्र व्यक्तिमत्व प्रस्थापित करणारे वडवाळ हे गाव कोणते? वडवळ नावाची दोन गावे आहेत. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळजवळचे वडवळ. दोन्ही ठिकाणी नागनाथांची मंदिरे आहेत. सोलापूर जिल्हयातील मोहोळजवळचे वडवळ आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील लातूचे जवळचे वडवळ. दोन्ही ठिकाणी नागनाथांची मंदिरे आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील वडवळला 'वडवळसिद्ध नागेश' असेच म्हणतात. मराठवाड्यातील औंढा नागनाथ या स्थानाशी नागेश संप्रदायाचा काही संबंध आहे काय? नागेश संप्रदायविषयक साहित्य आणि या संप्रदायाचे अनुयायित्व पत्करलेली घराणी ही सोलापूर जिल्ह्यातच आढळतात. त्यामुळे सोलापूर जिल्हयातील वडवळ हेच नागेशांचे स्थान, असा निर्णय घेण्याकडे संशोधकांचा कल आहे.

                   नागेशांचा निश्चित कालनिर्णय करणे कठीण आहे. नागनाथ ज्ञानदेवांचे समकालीन असल्याबद्दलची समजूत 'महाराष्ट्र सारस्वत' कारांनी नोंदलेली आहे. गो. का. चांदोरकर संपादित 'महाराष्ट्रीय संतकवि काव्य सूची' त इ. स. १३६८ ते १४१८ असा नागनाथांचा काळा दिलेला आहे. अज्ञानसिद्ध हे नागनाथांचे प्रसिद्ध शिष्य. त्यांच्यावर नागनाथांचा अनुग्रह शके १३१३ म्हणजेच इ .स. १३९१ मध्ये झाला असा निंदेश आढळतो. अज्ञानसिद्धांनी आपल्या 'संकटहरणी' नामक ग्रंथात असे म्हटले आहे :

                      शके तेराशे तेरा ।

                     मार्गशीर्ष शुद्ध नवमी गुरुवारा ।

                     प्रकटला नागेश फणीवरा ।

                     भवतशिरी डुल्लत ॥

'नागेश लीलामृत' हा नागेशसंप्रदायाचा महत्त्त्वाचा ग्रंथ. नागनाथांची भक्ती ज्या घराण्यात परंपरेने चालत आलेली आहे त्या घराण्यातील भास्कर उर्फ भानजी नामक गृहस्थाने लिहिलेला. या ग्रंथाचा रचनाकाळ इ. स. १८४८. वा. सी. बेंद्रे यांनी या ग्रंथाला आणखी अर्वाचीन ठरवून त्याचा रचनाकाल इ.स. १९३४ सुचविलेला आहे. हा ग्रंथ अर्वाचीन असला तरी नागेश संप्रदायाचे स्वरूप, त्याची शिष्यपरंपरा, त्यातील स्थानमाहात्म्य, त्याचे तत्त्वज्ञान, त्याचा चैतन्य संप्रदायाशी असलेला संबंध या सर्व मुद्दयांवर भरपूर प्रकाश टाकणारा असल्यामुळे अनन्यसाधारण महत्त्त्वाचा आहे.

                 साधुसंप्रदाय चार : स्वरूप, प्रकाश, आनंद व चैतन्य. यांपैकी नागनाथ हे चैतन्यसंप्रदायी आहेत. डॉ. यू . पठाण यांनी  'नागेश संप्रदाय' या पुस्तकात 'नागेश लीलामृता' तील पुढील ओवा उद्धृत केल्या आहेत त्यावरून नागनाथ चैतन्य संप्रदायाचे, असे म्हणता येते :

                    जगी साधुसंप्रदाय मार्ग ।

                   चार जे लाभता तुछ स्वर्ग ।

                   जे का भवबंधन - छेदन ।

                   निर्मिले सुवर्ग उत्तम ॥

                   एक ते स्वरूप संप्रदाय ।

                   प्रकाश संप्रदाय दूजा आहे ।

                   संप्रदाय आनंद तिसरा होय ।

                   चैतन्य पाहे मार्ग चवथा ॥

                   चैतन्य संप्रदाय यातृन ।

                    विलसे नागनाथासी सुपूर्ण ।

                    मुमुक्षु ऐक निश्चय वचन ।

                   संप्रदाये चैतन्य श्रीगुरूसी ॥

या संप्रदायातील अज्ञानसिद्ध, बहिरा जातवेद व कान्हो पाठक या

                 सर्व प्राणिमात्रांत, सर्व वस्तुजातात परमेश्वर भरलेला आहे. तो हिंदूंत आहे तसाच मुसलमानांतही आहे हे तत्त्वज्ञान नागेशांनी केवळ शिकविलेले नाही, तर ते स्वतः ते तत्त्वज्ञान जगले. त्यांनी हिंदूंप्रमाणे मुसलनांनाही जवळ केले, याबद्दल ते अनंत वंदनांस पात्र आहेत. 

            

ليست هناك تعليقات:

pritisdeshmukh25@gmail.com

صور المظاهر بواسطة RBFried. يتم التشغيل بواسطة Blogger.